जळगाव (प्रतिनिधी) पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार बीएचआर घोटाळा हा पूर्वनियोजित होता. एवढेच नव्हे तर यासाठी गुप्त कट रचण्यात आला होता. तसेच या गुप्त कटाचे तीन प्रमुख हेतू होते. तर हा पुर्वनियोजीत कट अंमलात आणण्यासाठी संशयित आरोपींनी काही खास व्यवस्था करून ठेवल्या होत्या. तर जाणून घ्या…’त्या’ ९ व्यवस्था काय होत्या?.
पुर्वनियोजीत कट अंमलात आणण्यासाठी संशयित आरोपींनी केलेली व्यवस्था
१) सुजित वाणी याची बीएचआर संस्थेत संगणक प्रमुख म्हणून नियुक्ती केली. प्रमोद माळी याला आस्थापना प्रमुख केले. प्रकाश वाणी हा ठाणे येथे रहात असुन सुध्दा त्याची मानद मुख्य प्रशासकिय विधी सल्लागार मार्गदर्शक म्हणून दरमहा रु. ३५,०००/- मानधन, प्रवास खर्च व अनुषांगिक खर्चावर नियुक्ती केली होती.
२) कृणाल शहा याचेकडून पतसंस्थेत व सुनिल झवरच्या ४२ खानदेश मिल जळगाव या कार्यालयातील संगणकावर बीएचआरचे स्वॉफ्टवेअर इनस्टॉल करून एकमेकांशी लिंक केले.
३) मुदत ठेवी, पावत्या जमा करणेसाठी एजंटची साखळी तयार केली.
४) जितेंद्र कंडारे, कृणाल शहा, प्रकाश वाणी अशांची निवीदा समिती स्थापन केली.
५) कर्जदारांचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल त्यासाठी चार्टर्ड अकाउंट यालाही सोबत घेतले. व त्याच्या मार्फतीने १८ टक्के व्याजदर व दोन टक्के दंड व्याज असताना काही प्रकरणे १० टक्क्यांनी तर काही प्रकरणे १२ टक्क्यांनी वार्षीक सरळव्याज दराने हिशोब तयार करायचे.
६) सुरज झंवरच्या मदतीने विविध निवीदा भरायच्या.
७) काही प्रश्न निर्माण झाल्यास विकास चोरडीया व महावीर जैनच्या मार्फत लेखा परिक्षण करून (फॉरेन्सीक ऑडीट) कोणताही गैरव्यवहार व अपहार झालेला नाही असा अहवाल तयार करून घ्यायचा.
८) सुनिल झंवरच्या कार्यालयातील लेखापाल याचीच बीएचआर संस्थेत लेखापाल म्हणून नियुक्ती करुन घ्यायची.
९) बीएचआरच्या कार्यालयात इतर कर्मचा-यांना कळू नये म्हणुन गैरव्यवहार, अपहाराच्या संदर्भातील कागदपत्रे सुनिल झंवर, सुरज झंवर यांच्या खानदेश मिल येथील कार्यालयात तयार करुन घ्यावयाची.