मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर २० तारखेला कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आर्यनची कारागृहातून सुटका व्हावी यासाठी आई गौरी खान प्रार्थना करत आहे. तसेच आर्यनची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारे गोडधोड बनवलं जाणार नाही, असा आदेश गौरीने आपल्या किचन स्टाफला दिला आहे.
सध्या सणासुदीच्या दिवसांमध्येही मुलाच्या अटकेमुळे मन्नतमध्ये शाहरुख आणि गौरी कोणत्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाहीयेत. एरवी दिवाळी असो किंवा ईद या सणांच्या दिवशी मन्नत बंगल्यावर विशेष रोषणाई केली असते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला होता. तसेच गौरीने आर्यनची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारे गोडधोड बनवलं जाणार नाही. शाहरुखच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, घरातल जेवणं बनवणारा व्यक्ती खीर बनवत असल्याचं लक्षात आल्यानंतर गौरीने त्याला तात्काळ थांबायला सांगितलं.
जोपर्यंत आर्यन तुरुंगातून बाहेर येत नाही तोपर्यंत घरात गोड पदार्थ बनवायचे नाहीत असा आदेश गौरीने आपल्या किचन स्टाफला दिला आहे. आर्यनच्या अटकेनंतर गौरी भावूक झाली आहे. शाहरुख आणि गौरी आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असून त्यांचा प्रत्येक दिवस फोनवर वकीलांशी सल्लामसलत करण्यात जातो आहे. शाहरुख आणि गौरी दोघांनीही आर्यनच्या सुटकेसाठी प्रार्थना करा असा संदेश आपल्या जवळच्या मित्रांना पाठवला आहे.