मुंबई (वृत्तसंस्था) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या अर्थसंकल्पाने नाराजी केली आहे. राज्याच्या वाट्याला काहीही आलेले नाही. जे आकडे येत असतात, ते किती खरे हे ६ महिन्यांनी समजते. पण सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय. देशाची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र त्यातही मुंबईच्या महसूलावर उभी मात्र महाराष्ट्राला काहीच नाही असेही ते म्हणालेत. कायम अन्याय होतो. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसतच नाही असेही ते म्हणाले. महाराष्ट्र देशाचं पोट आहे पण या पोटाकडे कोणी पाहात नाही. फक्त दोनच शहरांना मेट्रोचं गुळ फासलं. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट असेल तर ते देशाचं नव्हे तर एका राजकीय पक्षाचं बजेट आहे. त्यांना पेट्रोल बहुतेक १००० रुपये लीटर करायचंय, ‘पेट्रोलमुळे घरातच बसावं कायमचं असं त्यांना वाटतंय असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला.
‘नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.