चोपडा प्रतिनिधि : जल, जंगल जमीन या वसुंधरेच्या मूलभूत तत्त्वांच्या माध्यमातून एकंदरीत वसुंधरा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आजच्या वेगवान आधुनिक विकासाच्या प्रक्रियेत भूगोल अभ्यासकांची भूमिका लाख मोलाची ठरत आहे. कालानुरूप भूगोलाच्या अभ्यासाचे महत्व वाढलेले असून त्याचे शास्त्रीय स्वरूप आधुनिक काळात मौलिक ठरत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागामार्फत १४ जानेवारी या भूगोल दिनाच्या औचितत्याने आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. सूर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. आर.एम. बागुल, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ.शैलेश वाघ, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, पी. एस. पाडवी, रजिस्ट्रार डी. एम. पाटील आणि माजी भूगोल विभाग प्रमुख श्रीमती आशा पोतदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष, जल, माती व वसुंधरा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेश वाघ यांनी तर सूत्रसंचलन डॉ. संगीता पाटील व सौ.अनिता सांगोरे यांनी केले.
१४ जानेवारी भूगोल दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात भौगोलिक सामान्य ज्ञान परीक्षेत वरिष्ठ महाविद्यालयाच्या गटातून १५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्यामधून कु. तेजल गोपाल पाटील, कु. मयुरी वसंत पाटील व कु. गीतांजली रवींद्र धनगर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यासोबतच आशा भोंग्या बारेला व वैशाली पद्माकर महाजन यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. त्याचप्रमाणे भूगोल दिनानिमित्त तालुकास्तरीय भौगोलिक पोस्टर स्पर्धेचे देखील भव्य आयोजन भूगोल विभागामार्फत करण्यात आले होते. ज्यामध्ये चोपडा शहर व संपूर्ण तालुक्यातून पंधरा पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालय व पाचपेक्षा जास्त वरिष्ठ महाविद्यालयाच्या १३० हून अधिक विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. ज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटातून भाग्यश्री बाळू कोळी, सुरेश संतोष बारेला व राहुल किशोर बारेला आणि रोहिदास मेहरसिंग बारेला यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर आरती रमेश कोळी, विशाल बबलू बारेला, प्रियंका शरद कोळी, अनम सरफराज, अनिता रीस्तम पावरा व मालती रूपला पटले, हर्षदा समाधान कोळी आणि आम्रपाली प्रवीण मैलागिर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. तसेच या भौगोलिक पोस्टर स्पर्धेच्या वरिष्ठ महाविद्यालय गटातून जयश्री विलास साळुंखे, हर्षदिव्या सुनील सोनवणे, विना भरत तांबट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर शुभांगी कैलास बाविस्कर, पूर्वा विलास राणे, गायत्री दिनकर धनगर, शितल गोकुळ भिल यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम रु. १००१/-, ७०१/-, ५०१/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह याप्रमाणे होते. या पोस्टर स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र महाजन व दिनेश बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करून भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. शेकडो महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घेतला. भूगोल दिनाच्या आयोजनाची पार्श्वभूमी डॉ. मुकेश पाटील यांनी विषद केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोतीराम पावरा, अभिजीत पाटील, पवन पाटील, कल्पेश पाटील, नरेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन पी. एस. पाडवी यांनी केले.