पुणे (वृत्तसंस्था) मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला आहे.
मुंबईवरून पुण्याला कारमध्ये हे पाच जण येत होते. तेव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुभाजक ओलांडून गाडी विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही गाडी आली. काही कळायच्या आता गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीतील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. या अपघातात एकाच परिवारातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मयतांची नावे –
मासीदेवी तिलोक – वय ८२
सीमाराज तिलोक – वय ३२
शालीमराज तिलोक – वय १९
महावीरराज तिलोक – वय ३८
वाहन चालक -रिहान अन्सारी – वय २६