मेष : आजच्या दिवशी सकारात्मक फळ मिळणार आहे. मनोबल कमी असणार आहे. आज तुमच्यावर एखादे भावनिक दडपण राहण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होईल. मानसिक अस्वस्थता राहील. चिंता सतावेल. अतिविचार करणे टाळावे. थोडक्यात आजचा दिवस चांगला जाईल.
वृषभ : आज खर्चात वाढ होणार आहे. तुमच्या वाढत्या खर्चांमुळे तुम्हाला काळजी वाटू लागेल. नवीन परिचय होणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्याची साथ लाभेल. तुमच्या व्यवसायात आर्थिक बाबतीत थोडे सावध असले पाहिजे. जिद्द वाढणार आहे.
मिथुन : आजचा दिवस प्रगतीचा दिवस असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. नको असलेल्या गोष्टींचा ताण घेऊ नये, मनोबल कमी राहील. छोटा व्यवसाय करण्याचा विचार करायला हरकत नाही. आपला वेळ आपण वाया घालवतोय, ही भावना त्रस्त करेल. आज डोकेदुखीची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
कर्क : आज तुमचा चिडचिडा स्वभाव तुमच्या कामात सुद्धा आडवा येऊ शकतो. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक ताण कमी राहील. बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. तुमच्यामध्ये वैचारिक परिवर्तन होणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आजचा दिवस थोडा त्रासदायक जाईल.
सिंह : आज एखाद्या कामासाठी तुम्हाला पैसे उधार घेण्याची गरज भासेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आनंदी मनाने कार्यरत राहिल्याने उत्साहात दिवस जाईल. आज फार व्यग्र राहणार आहेत. कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात. आज आपले वागणे व बोलणे आशावादी असणार आहे. कौटुंबिक वादामुळे कोणताही निर्णय घेऊ नका.
कन्या : आज व्यावसायिक वृद्धीसाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. मनोबल उत्तम राहील. व्यवसायात अडकलेला पैसा मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास संभवतो व ते प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य व मनोबल उत्तम असणार आहे. तरुणांचे जर कोणाशी प्रेमसंबंध असतील तर त्यांनी प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर शंका उपस्थित करू नये.
तुळ : व्यवसायाशी निगडीत देण्याघेण्याच्या व्यवहारात हस्तक्षेप करण्याची गरज. मानसिकता प्रसन्न असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद साधणार आहात. काहींना आनंदवार्ता समजेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज त्वचेचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात
वृश्चिक : राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील. नावीन्यपूर्ण राहाल. कामाचा ताण वाटणार नाही. रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीत गुंतवणूक करणाऱ्यांनी आज सावध राहण्याची गरज. आज तुमचे आनंदी व आशावादी बोलणे सर्वांना प्रभावित करेल. बदलत्या वातावरणामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
धनु : तुम्हाला एकाहून अधिक स्त्रोताकडून पैसे मिळाल्याने तुम्हाला आज समाधान लाभेल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. मानसिक थकवा जाणवणार आहे, त्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात अधिक पैसे मिळवण्यासाठी कोणतेही चुकीचे काम करू नये.
मकर : आजचा दिवस काही योजना आखण्यात निघून जाणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा मोबदला मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. सरकारी नोकरी करणारे लोक आज बदली झाल्याने थोडे काळजीत असतील. प्रवास सुखकर होणार आहेत. नवीन ओळखीचा फायदा होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे.
कुंभ : आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नोकरदार लोकांना त्यांच्या कुवती प्रमाणे काम मिळाल्याने ते प्रसन्न असतील. आजच्या कामाचे तुम्ही सुनियोजन करणार आहात. तुमच्यामध्ये काही सकारात्मक बदल होत आहेत, ही गोष्ट तुमच्या प्रगतीसाठी पूरक आहे. व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल थोडे सावध असले पाहिजे.
मीन : आजचा दिवस तणावपूर्ण राहणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण झाल्याने आनंदी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबात बऱ्याच काळापासून सुरु असलेले वाद विवाद आज संपुष्टात येतील. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुम्ही आपले विचार मांडणार आहात. व्यवसायाचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमचे पैसे हुशारीने गुंतवले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल.