चोपडा दि.८(प्रतिनिधी): दोन दुचाकींसह ओमनीत झालेल्या धडकेनंतर तिघांचा मृत्यू ओढवला असून चौघे जखमी झाले आहेत. हा अपघात अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शनिवारी रात्री घडला. शुभम ओंकार पारधी (21, सुंदरगढी, चोपडा), विजय बाळू पाटील (28, गुजरअळी, चोपडा), केवाराम पावरा (25, आदिवासी वसतीगृहाजवळ, चोपडा) अशी मयतांची नावे आहेत.
चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आल्यानंतर एका दुचाकीवर तिघे असे दुचाकी क्रमांक (एम.एच.19 डी.एल 8693) व अन्य एका दुचाकीवरून तिघे चोपड्याकडे येत असताना चोपड्याकडून टॅक्सी क्रमांक (एम.एच.19 वाय.1828) ही प्रवाशांना घेवून येत असताना अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात हलवल्यानंतर मृत्यू झाला.
अपघातातील जखमी टॅक्सी चालक विजय महाजन याला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर प्रवासी ज्ञानेश्वर सोनार व पियुष दीपक मिस्त्री लोहया नगर चोपडा व अन्य दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.