मेष : दिनांक २५, २६ रोजी कारण नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते, त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे राहील. अंगलट आलेल्या गोष्टींना शांतपणाने हाताळल्यास त्यातून सुटका होईल. या दिवशी कोणत्याही गोष्टीचा रागराग करून चालणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. शुभ रंग – किरमिजी
वृषभ : आर्थिक बाबतीत बचत करणे इष्ट राहील. सामाजिक ठिकाणी जनसंपर्क उत्तम राहील. जुन्या मैत्रीच्या गाठीभेटी पडतील. मुलांच्या दृष्टीने प्रगती होईल. कुटुंबाची मदत मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या. ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. गोड बोलून प्रभाव पाडाल. वाद टाळणे लाभाचे. हातून धार्मिक कार्य घडण्याचा योग आहे. शुभ रंग – आकाशी
मिथुन : अनुकूल अनेक अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग येतील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक बढती मिळेल. पगारवाढीच्या मागणीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल. घरी पाव्हण्या रावळ्यांची लगबग राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. मनात काळजीचे विचार राहतील. शुभ रंग – पोपटी
कर्क : सप्ताहाच्या प्रारंभी प्रवास टाळणे योग्य ठरेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मानमरातब मिळेल. नोकरीत काही अनपेक्षित बदल होतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक ठिकाणी संस्मरणीय कार्य घडेल. शुभ रंग – चंदेरी
सिंह : २३ मे रोजी शुक्र मेष राशीत भाग्यस्थानात प्रवेश करेल. काही कटू काही गोड अनुभव या सप्ताहात येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. सावध राहा. खात्री केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकू नका. शुभ रंग – नारिंगी
कन्या : द्विधा अवस्थेमुळे तडकाफडकी निर्णय घेऊ नका. एखाद्या गोष्टीचा जाणून-बुजून पाठपुरावा करणे टाळा. वैयक्तिक बाबी इतरांसमोर मांडू नका. परिस्थितीशी मिळते-जुळते घ्या. काहीना अचानक धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल. एखाद्या क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा होईल. त्यामुळे मनावरील दडपण निघून जाईल. शुभ रंग – हिरवा
तूळ : ग्रहमान सामान्य राहील. काही ठिकाणी संघर्ष करावा लागेल. हाती घेतलेले काम झालेच पाहिजे, असा अट्टहास करू नका. मीपणाची भावना सोडून द्या. स्वत:ला त्रास होणार नाही अशाच गोष्टी करा. नोकरदार वर्गाला हजरजबाबीपणामुळे काही तरी चांगले पदरात पडेल. प्रवासात काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. दुखणे अंगावर काढू नका. मनात लेष्ट काळजचे विचार राहतील. भविष्याची चिंता नावरील वाटत राहील. गुप्त शत्रूपासून सावध राहा. शुभ रंग – आकाशी
वृश्चिक : तब्येत जपा. प्रगतीचा योग आहे. वेळ आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. सावध राहा. संयम पाळा. दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नादात चुकीचे पाऊल उचलू नका. न जमणाऱ्या गोष्टींसाठी धडपड करणे टाळा. जे जमणार नाही ते स्पष्टपणे सांगून रिकामे व्हा. अडकून राहू नका. बाकी दिवस चांगले जातील. शुभ रंग – गुलाबी
धनू : भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. काही कारणांनी व्यवहारावरून वाद होऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे. घरी पाहुणे येतील. वाद टाळणे आणि मुक्तसंवाद साधणे हिताचे. जबाबदारी ओळखा आणि पूर्ण करा. माणसं ओळखणे हिताचे. वास्तवाचे भान राखणे गरजेचे. शुभ रंग – सोनेरी
मकर : नोकरदार वर्गाचे प्रभावक्षेत्र वाढते राहील. व्यावसायिकदृष्टय़ा अनेक क्षेत्रांतून आलेले प्रस्ताव स्वीकारा. त्यातून फायदा राहील. केलेल्या व्यवहारातून अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. घरात चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. घरी पाहुणे, जवळचे मित्र येतील. शुभ रंग – काळा
कुंभ : जवळपासचे प्रवास होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून राहा. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन केल्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. लघुलेखन, फोटोग्राफी, वादक, शिल्पकला, कापड व्यापारी इत्यादी व्यवसायांतील गती वाढेल. विविध प्रकारचे लाभ होतील. घर, शेती खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात येईल. शुभ रंग – राखाडी
मीन : ओळखीच्या व्यक्तींना वेळ द्या. शब्द जपून वापरा. नम्रता आणि कृतज्ञता हिताची. वास्तव आणि व्यवहाराचे भान राखणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. विशेषतः क्रेडिट कार्ड, पासवर्ड इत्यादी माहिती देऊ नका. व्यवसायात आवक-जावक उत्तम राहिली तरी व्यवहारात फसगत होणार नाही याची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. शुभ रंग – पिवळा