TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावकरांना रस्ते कर माफ करून आरोग्यासाठी खर्च द्या ; पराग कोचुरेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात जळगावकरांना रस्ते कर माफ करून त्यांच्या आरोग्य व वाहन दुरुस्तीसाठीचा खर्च शासनाने द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवलेले पत्र त्यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.

 

माननीय मुख्यमंत्री साहेब, 

महाराष्ट्र राज्य,  भारत. 


सस्नेह नमस्कार, 

मी, पराग घनश्याम कोचुरे, रा.  जळगाव,  जिल्हा/तालुका जळगाव,  एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यास हे पत्र पाठवत असून आपल्याकडून सकारात्मक कारवाईची अपेक्षा करत आहे.

तर पार्श्वभूमी अशी आहे की,  जळगाव येथील रस्ते ( तसा एकही मार्ग रस्ता म्हणायच्या लायकीचा नसून मला हा शब्द वापरावा लागतो आहे) गेल्या कित्येक वर्षापासुन अतिशय दुरावस्थेत आहेत. तरी, गेल्या 2 निवडणुकांपासून, म्हणजेच 2014 व 2019, आम्हास भाजप व्यक्तींकडून रस्ते दुरुस्त करू अथवा  रस्ते कर माफ करू हे आश्वासन देण्यात येत आहे. त्यावर जळगाव येथे येऊन आमचे पर्सनल संकट मोचन गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी स्वतः येऊन ह्या वचनाची पुष्टी छातीठोकपणे केली होती.  ह्याच आशेवर आम्ही त्यांना 2 वेळेस निवडूनही दिले आहे. येथील सुरेश दामू भोळे आमदार, उन्मेष पाटील खासदारच नव्हे तर महानगरपालिकेच्या सत्तेवर सुद्धा भाजप निवडून आम्ही प्रगतीच्या अपेक्षा ठेवुन आहोत.

आम्ही नागरिक ह्या अपेक्षा ठेवुन व त्याचा सतत अपेक्षाभंग होत असल्या कारणाने मला आज आपल्याला हे पत्र लिहावे लागत आहे. आमच्याकडे रस्त्यांमुळे गाड्याच नाही तर आमचे स्वास्थ्य सुद्धा खराब होत आहे. मान, मणके, कंबर ह्याचे तर त्रास आहेतच पण गाड्याही दर 5 दिवसाला काम काढत आहेत. आपल्यास जळगाव येथे येऊन माझ्या घरी 4 दिवस राहण्याची नम्र विनंती करतो. ह्या कालावधीत मी दुसरे काहीही काम न करता आपल्यास माझ्या दुचाकीवरून सकाळी व सायंकाळी 1 तास जळगाव फिरवू अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जो आपल्या कंबरेला, मानेला, मानण्याला व इतरही जे त्रास त्या 4 दिवसात होतील त्याचे उपचार स्वखर्चाने करण्यास तयार आहे.

 

दुचाकीवर फिरल्याने आपल्याला आमच्याकडील रस्त्यानी अंग दुखी होईल त्यासाठी मी एक मालीश करणारा सुद्धा बघून ठेवला आहे. तरी माझी अशी ईच्छा आहे की आम्ही जळगावकर जे रोज अनुभवतो ते आपण 4 दिवस अनुभवून मग येथील परिस्थितीवर आपल अमूल्य मत प्रकट करावे. येण्याची वेळ खालील मोबाईल नंबरवर कळवावे. हे जर शक्य नसेल तर कृपया आमच्या येथील रस्ते नूतनीकरणासाठी काही मार्ग काढावा कारण साध्या जे आमची महानगरपालिका मुरुम व कच टाकून रस्त्यांची लाली पोती करत आहेत ते निव्वळ पैसे खायचे व घाणेरड्या नियोजनाचा परिणाम आहे.

 

जर तसेही शक्य नसेल तर जळगाव येथील रहिवाशांचे रस्ते कर तर माफ करण्यातच यावे अधिक त्यांच्या गाड्या सुधारण्याची व आरोग्याच्या खर्चाची सुद्धा शासनाने सोय करावी. आपल्या वर मला पूर्ण विश्वास असून आपण योग्य तेच पाउल उचलाल ह्याचीही खात्री आहे. आपल्या राज्यात राहणारा एक सामान्य नागरिक…!

पराग घनश्याम कोचुरे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

धरणगावात पेव्हर ब्लॉक बसविण्यास सुरुवात ; उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार !

September 6, 2020

कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त

December 8, 2025

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४० किमीच्या १७ रस्त्यांना मंजुरी !

January 18, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2025

March 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group