वरणगाव (प्रतिनिधी) नगर परिषदेचा कारभार संपुष्ठात येऊन प्रशासक नेमणुकी नंतर कोवीड १९ कोरोना आजाराचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढल्याने जनजिवन विस्कळीत झाले होते. मात्र मागील महिन्या पासुन हा प्रार्दुभाव कमी झाल्याने आता शहरात राजकिय चार्चा सोबत भावी नगर सेवकास नगर परिषद निवडणुकीचे आतापासुन वेध लागले आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदे पैकी जिल्ह्यातील वरणगाव नगर परिषद ९ सप्टेबर २०१४ रोजी अस्तीवात येऊन २३ मार्च २०१५ रोजी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे पाच, चार अपक्ष एक शिवसेनेचा नगर सेवक निवडूण आले होते. त्यात अपक्षाच्या पाठबळावर भाजपच्या २३ मार्च २०१५ रोजी पहिल्या महिला अध्यक्षा अरुणाबाई इंगळे झाल्या होत्या. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा अध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली. आणि त्यात भाजपात दोन गट निर्माण झाले आणि या चुरसीच्या निवडणुकीत एका गटाने शिवसेना एक, अपक्ष दोन, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच व भाजपाचे तीन असे असून माजी मंत्री गरिष महाजन यांच्या शब्दा खातर यांची आघाडी होऊन पुन्हा भाजपाचे सुनिल काळे नगराध्यक्ष झाले होते. यात मात्र दोन्ही नगराध्यक्षाच्या कार्यकाळात जातीय सलोखा पाहवयास मिळाला तो म्हणजे उपनगराध्यक्षपदी शे.अखलाख शे.युसुफ यांनी सलग पाच वर्षाची झालेली निवड आणि तो कार्यकाळ शेवटच्या काही दिवसाच्या अंतरावर नगर परिषदेच्या निवडणुक कार्यकमाची सुरुवात झाली होती. त्यात प्रभाग, वार्ड रचना प्रभागातील आरक्षण सोडत, मतदार यादी प्रसिध्दी करणे .व त्यावरील हरकती इत पर्यंत कार्यक्रम पार पडला व त्या नतंर दि ५ जुलै २०२० परिषदेचा कार्यकाळ संपल्याने नगर परिषदेवर प्रशासकाची नेमनुक झाली. त्याच्यातच कोरोना या महामारीच्या आजाराने थैमान घातले लॉक डाऊन सुरू झाले होते. प्रशासन हा आजर रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना या काळात घरा बाहेर एकही व्यक्ती दिसत नव्हता सर्व काही बंद बंद दिसत होत. कारण सरकारने तसे निर्बध लावले होते त्यात मोल मजुरी करणाऱ्याचे या दरम्यान खुप हाल होते. मात्र जनतेच्या सेवेसाठी सुध्दा मदतीचे हात शहरातील नगरसेवकासह भल्या भल्यानी पुढे करत आपल्या परिने अन्नधान्य व जिवनाशक वस्तु देऊन मदत करीत जनजिवन सुरळीत होण्यास मदत केली होती. त्यात काहीनी नगर परिषद निवडणुक डोळ्या समोर ठेऊन मदत केली. जेणे करून आपल्याला निवडणुकीत कशी मदत होईल अशी आशा बाळगुण ते आता शहरात वावरत आहे. जनु काही निवडणुका आज ना उद्या लागणार आहे. मात्र राज्य निवडणुक आयोगाने २५ डिसेबर पर्यत स्थानिक स्वराज्य संस्था सारख्या निवडणुकीस स्थगीती दिली असुन त्या नंतर निवडणुका कदाचित जाहीर होतील. कोरोना या आजाराचे प्रमाण कमी व शासनाने लावलेल्या नियमाचे काही प्रमाणात निर्बध हटविल्याने नागरिक कामा निमीत घरा बाहेर पडत असुन त्या निमीताने पाणी पुरवठा योजने वरील स्थगिती उठविण्यासाठी भाजपाने बसस्थानक चौकात आदोलन करून निवडणुक नादी सुरु झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा घेऊन कार्यकर्त्याना कामाला लागण्याचा सल्ला दिला तर पी.आर.पी ने ही मेळावा घेऊन निवडणुकीत सज्ज असल्याचे दाखविले आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश घेतल्याने राजकिय समीकरण बदणार आहे. तर भाजपाने दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यात एक प्रकारे जोश भरण्याचे काम केले असल तरी पुढील प्रवास खडतर असणार आहे असे वाटते मात्र सुनिल काळे यांनी आपल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ केलेले विकास कामाच्या जोरावर ते जनते समोर जाऊ शकतात. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात उत्साहाचे वातावरण जरी असले तरी उमेदवारी देताना मात्र अडचन निर्माण होऊ शकते. त्यात मात्र शिवसेनेचे संथगतीने काम सुरू आहे. कारण या निवडणुकीत राज्य सरकार सारखी आघाडी करुण तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुक लढतात की काय हेही तितकेच महत्वाचे आहे.
अशा प्रकारे प्रत्येक राजकारणी, दिग्गज कार्यकर्ते व स्वयघोषीत पुढारी आपआपल्या परीने निवडणुक प्रक्रिया घोषीत होण्याची चातकासारखी वाट पाहत असुन लहान मोठे कार्यक्रम घेऊन मीच उमेदवारीस योग्य असल्याचा आव आणताना दिसत आहे. काही तर वार्डातील प्रमुख तरुणाना हाताशी धरून अधुनमधुन हॉटेलच्या ओल्या जेवणाचा आस्वाद देत आहे. काही असो येणारी नगर परिषदेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची होईल असे चित्र दृष्टीस पडत आहे.
असो एकदा का निवडणुक जाहीर झाली की मैदानात कोण कोण भावी नगरसेवक या निवडणुकीच्या रिगणात उतरतो व हा आखाडा गाजवतो हे पाहण्यास वरणगावकराना उत्सुकता लागलेली आहे.