TheClearNews.Com
Friday, May 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईला आणि महाराष्ट्राला पर्याय येईल ?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2020
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

डॉ. विनय काटे : मुंबईने लोकांची जात-धर्म-प्रांत-भाषा न पाहता त्यांच्या कर्मावर त्यांची स्वप्ने पुरी करण्याची संधी दिली, मग तो दिल्लीतून आलेला शाहरूख असो की युपीमधून आलेले नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी असोत. मुंबई ज्या सुरक्षिततेने आणि स्वतंत्रतेने, तुमची ओळख न विचारता तुम्हाला ओळख बनवायची आणि आयुष्य जगायची संधी देते, ती संधी तुम्हाला नोएडा किंवा अहमदाबाद कधीही देणार नाही.

 

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 मे 2025 !

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

मी 2011 ते 2013 या काळात अहमदाबादला होतो. त्या काळात आजचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2012 ला जेव्हा ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा अचानक “गुजरात मॉडेल” ची चर्चा भारतीय मीडिया करू लागला. परदेशातल्या प्रगत शहरांचे फोटो अहमदाबादचे म्हणून भाजपचा आयटी सेल सोशल मीडियात फिरवत होता, आणि लोक त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत होते. Vibrant Gujarat च्या आयोजनात देशी-विदेशी कंपन्यासोबत काही लाख करोड रुपयांचे MoU झाले अशा बातम्या येत, पण मीडियाला MoU आणि Agreement मधला फरक कळत नसल्याने तो आता अहमदाबाद न्यूयॉर्क किंवा बीजिंगच्या सारखे बनणार अशा थाटात देत होता. MoU करण्यास कुणालाही काहीही द्यावे किंवा घ्यावे लागत नाही. मी वैयक्तिक एक छोटी कंपनी काढून कुठल्याही सरकारशी किंवा दुसऱ्या कंपनीशी हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा MoU करू शकतो, भले माझ्या कंपनीकडे हजार रुपये का नसेना! Vibrant Gujarat मध्ये तर शाळेतल्या मास्तर लोकांनाही सूट बनवून उद्योगपती म्हणून बसवले गेल्याच्या बातम्याही होत्या.

2012 आणि 2013 च्या IIM Ahmedabad च्या प्लेसमेंट मी जवळून पाहिल्या. 2013 ला माझ्या बॅचमधले 350 लोकांमधले फक्त दोघेजण अहमदाबाद मध्ये नोकरीला लागले, बाकी सगळे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर इथे गेले. IIM मधले जॉब्स हे कॉर्पोरेटमधले वाढीव पगाराचे असल्याने मी या आकड्यांनाही दुर्लक्षित केले. पण माझ्या ओळखीच्या, ऐकिवात असलेल्या एक माणसाचा अपवाद सोडून (जो माझ्यासारखाच फक्त त्याच्या बायकोच्या उच्च शिक्षणापुरताच तिथे आला होता) दुसरे कुणीही अहमदाबादला नोकरीसाठी आल्याचे समजतच नव्हते. केंद्र सरकारी बॅंका सोडल्या (ज्यात सक्तीची परराज्यात बदली असते) तर कुठेच गैरगुजराती माणूस अहमदाबादला नोकरी किंवा व्यवसाय करायला आल्याचे दिसतच नव्हते. एखादे शहर जर आर्थिक प्रगतीचे केंद्र होत असेल तर परराज्यातले लोक तिकडे स्थलांतर करतात, हे साधे अर्थशास्त्र आहे. आणि गुजरात मॉडेलची फसवेगिरी इथेच लक्षात येते.

आता मुंबईवरचा आकस म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये जागतिक दर्जाचे सिनेनिर्मीती केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेचे स्वागतच आहे कारण मुंबईने किती काळ उत्तर भारतीय (गुजराती पकडून) लोकांचे लोंढे स्वतःमध्ये सामावून घ्यावे यालाही मर्यादा आहेच. पण ही घोषणा करताना मुंबई आज जिथे दिमाखात उभी आहे त्याला कारण काय आहे याची आदित्यनाथ यांना कल्पना नसावी. ब्रिटिशांनी मुंबईला खऱ्या अर्थाने औद्योगिक आणि व्यापारी शहर बनवले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मुंबईतले वातावरण कापडाच्या गिरण्यांसाठी आदर्श असल्याने आणि सोबत तिथे बंदर असल्याने ब्रिटिशांनी मुंबईवर विशेष प्रेम केले. उत्पादन आणि व्यापार या दोन्ही गोष्टींसाठी त्यांना मुंबई ही सगळ्यात योग्य जागा होती.

 

कलकत्त्यापेक्षाही मुंबई त्यांना पश्चिमेकडे व्यापार करण्यासाठी सोयीस्कर होती. आणि लुटीयनची दिल्ली फक्त प्रशासकीय राजधानी म्हणून त्यांनी उपयोगात आणली होती. ब्रिटिश गेल्यानंतर जेव्हा मराठी लोकांनी रक्त सांडून मुंबईसह महाराष्ट्र बनवला, तेव्हा या महाराष्ट्राने मुंबईची मिश्र संस्कृती आणि व्यापार-उदीम जपून ठेवला. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातला दक्षिण भारतीय लोकांना झालेला विरोधही प्रामुख्याने रेल्वेमधील नोकऱ्यांच्या अनुषंगाने होता, नंतर तोही गळून पडला. कुठलेही शहर व्यापारी केंद्र बनण्यासाठी काही भौगोलिक गोष्टींसोबतच तिथली कायदा-सुव्यवस्था ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट असते. मुंबईत ही कायदा सुव्यवस्था गेली दोन शतके अबाधित आहे. मुंबईत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्या कुठेही, कधीही मुक्तपणे सरकारी आणि खासगी वाहनाने सुरक्षितपणे संचार करू शकतात (मुंबई पोलिसांचे यासाठी अभिनंदन????), म्हणून इथे स्रीरूपी अधिकचा काम करणारा वर्ग उपलब्ध होतो, जो मुंबईच्या सुबत्तेत पुरुषांइतकीच भर टाकतो. दुसऱ्या बाजूला गुडगाव किंवा नोएडामध्ये आजही संध्याकाळी 7 नंतर मुली किंवा स्त्रिया एकट्याने बाहेर पडू शकत नाहीत.

उत्तर भारतीय राज्यांमध्ये आजही तुमचे आडनाव आणि जात एकच असते म्हणून तुम्ही काहीही व्यवसाय किंवा नोकरी करायला गेला की तुमची जात आडवी येतेच. मुंबईत cosmopolitan समाज असल्याने इथे लोकांना जाती-धर्म किंवा भाषा यांच्याशी घेणेदेणे नसते, तर फक्त कामाशी मतलब असतो. म्हणून ज्याला स्वतःची ओळख स्वतःच्या कामातून घडवायची आहे त्याला उत्तर भारत सोडून मुंबईला यावेच लागेल. मुंबईत मोलमजुरी करणारे बहुसंख्य उत्तर भारतीय हे खालच्या जातीतील आहेत ज्यांना त्यांच्या गावात जमिनीही नाहीत आणि कामाची, जीवाची किंवा अब्रूची शाश्वतीही नाही. अशा असंख्य लोकांना मुंबई स्वतःमध्ये सामावून घेते आणि माणूस म्हणून जगायची संधी देते. कुणी श्रीमंत आहे म्हणून त्याला जीवाची किंवा लुटला जाण्याची भीती मुंबईत नाही, आणि कुणी गरीब आहे म्हणून त्याला उपाशी मरण्याची भीतीही मुंबईत नाही.

मुंबईने लोकांची जात-धर्म-प्रांत-भाषा न पाहता त्यांच्या कर्मावर त्यांची स्वप्ने पुरी करण्याची संधी दिली, मग तो दिल्लीतून आलेला शाहरूख असो की युपीमधून आलेले नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी असोत. मुंबई ज्या सुरक्षिततेने आणि स्वतंत्रतेने, तुमची ओळख न विचारता तुम्हाला ओळख बनवायची आणि आयुष्य जगायची संधी देते ती संधी तुम्हाला नोएडा किंवा अहमदाबाद कधीही देणार नाही. आपल्या ओळखीतले किती लोक अहमदाबाद किंवा दिल्ली एनसीआरमध्ये खासगी नोकरीसाठी जातात हे पाहिलं तर सहज कळतं की स्थलांतर आजही मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे होतं, इथून बाहेर उत्तरेकडे शक्यतो कुणी जात नाही, कारण उत्तरेने अजून cosmopolitan बनण्याकडे पाऊलही टाकले नाहीये. उत्तरेने ते पाऊल टाकावे आणि स्वतःचा, स्वतःच्या लोकांचा खरा विकास घडवून आणावा ही त्यांना शुभेच्छा! मुंबईची आणि महाराष्ट्राची रेष छोटी करण्यापेक्षा स्वतःची वेगळी मोठी रेष मारून दाखवावी एवढीच अपेक्षा ????

डॉ. विनय काटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 मे 2025 !

May 9, 2025
जळगाव

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

May 9, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2025

May 8, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 7 मे 2025 !

May 7, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2025

May 6, 2025
Next Post

रावेरच्या ५ उपद्रवींवर एकाचवेळी 'एमपीडीए'ची कारवाई ; गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाचव्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता

September 22, 2021

वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगाव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन !

October 19, 2020

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली

March 15, 2021

मध्यप्रदेशातील डॉक्टर निघाला बनावट नोटांचे सिडींकेटचा मोहरक्या ; पोलिसांनी केली अटक !

April 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group