मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे ईडी हेच सगळ्यात मोठं कारणं असल्याची आरोप केला जात आहे. एकनाथ शिंदे नव्हे तर त्यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या एका सचिन नामक व्यक्तीला ईडीने नोटीस पाठवली होती, अशा आशयाची एक पेपर कटींग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या बातमीतून आपण जाणून घेऊ शिंदेंच्या बंडामागे सचिन जोशी कनेक्शन?, सचिन जोशी कोण आहेत? आणि कुठे आहेत?, याची संपूर्ण माहिती !
व्हायरल झालेल्या या पेपर कंटींगने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळची असणारी ही व्यक्ती त्यांचे व्यवहार सांभाळणारे सचिन जोशी असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता सचिन जोशी कुठे आहेत? सचिन जोशी यांचा शिंदेंच्या बंडासोबत नेमकं कनेक्शन काय? असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. सचिन जोशी हे एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते, असं सांगितलं जात आहे. पण अधिकृतपणे त्यावर अद्याप कुणीही काहीही बोलले नाहीय. सचिन जोशींसह ठाण्यात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडून शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळले जातात, अशी देखील चर्चा आहे.
हम्स लाईव्ह न्यूजच्या रिटा कुरीयन यांनी 24 जून रोजी दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदेंच्या आर्थिक व्यवहारांचे सेक्रेटरी म्हणून सचिन जोशी यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांना दहा दिवसांपूर्वी ईडीनं नोटीस पाठवली होती. तेव्हापासून सचिन जोशी हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सचिन जोशी आता नेमके कुठे आहेत?, यावरुन चर्चांना मोठे उधाण आले आहे. सचिन जोशी हे धर्मवीर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच नॉट रिचेबल होते, असं वृत्त एका मराठी वृत्तपत्रानं दिलं होतं. दरम्यान, सचिन जोशींना ईडीची नोटीस आली होती का? याबाबत धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांना विचारण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सचिन जोशी हे एकनाथ शिंदेंसोबतच आसाममध्ये असल्याचं म्हटलं होते.