जळगाव (प्रतिनिधी) येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कुलमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी व प्राथमिक विभागाचे पालक शिक्षकांच्या भूमिकेतून इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले.यानंतर इ.१० वी च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेचे प्राचार्य श्री. अमित सिंह भाटिया, शाळेच्या समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिराव, अनघा सागडे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वेणू मुंदरा ,आरोही वर्डीकर व इयत्ता पाचवी च्या विद्यार्थी देवेश पाटील, निमिष कुलकर्णी या विद्याथीनींनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. माझे तसेच ज्या पालकांनी ऑनलाईन पद्धतीने शाळा चालवली त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरिता ठाकूर सुवर्णा चौधरी मीनल जैन प्रबोध विसपुते या पालकांनी व शिक्षक बनलेले विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर अक्षत झाबरे व रेवती मोरे यांनी कविता सादर केली.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी ऑनलाईन खेळाचे आयोजन केले होते.यानंतर शाळेचे प्राचार्य श्री.अमित सिंह यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा चांदसरे,शरयू चौधरी या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन संमृद्धी कुरंभट्टी हिने केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मिनू छाजेड,विजया कोकाटे, भारती अत्तरदे, सुचिता बोरसे तेजस्वी बाविस्कर मनोज भादुपोता दिग्विजय पाटील हे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.