धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर येथून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, गणेश नारायण भांडारकर हे १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चांदसर शिवारातील शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची हिरोहोन्डा कं.ची एच.एफ .डिलक्स. क्र.(M.H.१४ BL१३७८) ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ हे करीत आहेत.