जळगाव (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एलसीबीच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. शेख सलीम शेख शब्बीर (रा. घरकुल बिल्डींग, जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात एक गुन्हा दाखल होता. चोरीची मोटारसायकल जामनेर शहरात असल्याची माहिती गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. एलसीबीच्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, पो.ना. युनुस शेख, पो.ना. किशोर राठोड, पोहेकॉ सुरज पाटील यांनी आरोपी शेख सलीम शेख शब्बीर याला दुचाकीसह रविवारी अटक केली. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.