पुणे (वृत्तसंस्था) ‘मी सीरम इनस्टिट्यूटची कोरोनावरील लस घेतल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण, ते खरं नाही. त्यांच्याकडे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ती लस आज मी घेतली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिली आहे. ते सीरम इनस्टिट्यूटला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हॅक्सीनचे भारतात पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटकडून उत्पादन होणार आहे. याच सीरम इनस्टिट्यूटला शरद पवार यांनी आज भेट दिली. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी सीरम इनस्टिट्यूटची कोरोनावरील लस घेतल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण, ते खरं नाही. त्यांच्याकडे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.