धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी भूपाळी आरती नंतर 8.15 वाजता कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सप्तशती पाठाचे जास्तीत जास्त संख्येने भाविक व सेवेकऱ्यानी पाठात सहभागी व्हावे. सोबत येताना श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ, श्री नित्यसेवा स्तोत्र मंत्र ग्रंथ, श्री भटुक भैरवनाथ ग्रंथ सोबत आणावा,असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव तालुक्याचा वतीने करण्यात आले आहे.