जळगाव (प्रतिनिधी) येथील सागर पार्कवर आज बुच झाडाची १२ फूट उंचीची रोपे पुनर्प्रत्यारोपण करून लावण्यात आली. मेहरूण तलावाच्या काठाला बुचाच्या झाडाखाली असलेली रोपे अलगद काढून सागर येथे ठिकाणी लावण्यात आली.
या करीता २ दिवस सतत पाऊस हवा व जमिनीचे पोट भरले असलेकी ही रोपे हमखास जगतात. नर्सरीत १२ फूट उंचीचे सदर रोपे ३०० ते ३५० रुपयाला मिळतात. केवळ २० रुपयात आपणाला ही रोपे तयार करतात येतात. या प्रसंगी उद्योजक प्रकाश चौबे, सुबोध चौधरी, चंद्रशेखर नेवे, स्थायी सभापती ऍड शुचिता हाडा, अपर्णा भट कासार, वैशाली पाटील, भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठानचे सचिव वनश्री विजय वाणी यांनी नियोजन केले. ऍड जमील देशपांडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमांस भरारी फाउंडेशनचे सहकार्य लाभले.