जळगाव (प्रतिनिधी) अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना शहरातील रामानंद नगर रोडवरील चर्च जवळ सोमवारी रात्री घडली.
सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गजानन हॉऊसिंग सोसायटीत राहणारे पांडूरंग पुरूषोत्तम बडे व त्यांची पत्नी लता बढे हे घराजवळ फिरत असतांना समोरून दुचाकीने येणाऱ्या दोन तरूणांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४० हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र ओढून पसार झाले. दरम्यान, पांडूरंग बडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण झाले आहे.