नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते आज अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी १९९६ ते २००४ दरम्यान संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. २०१४ साली भाजपने त्यांना लोकसभेचे तिकिट दिले नव्हते. नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वर्षी त्यांना दुखापत झाली आणि ते कोमात गेले. भारतीय सैन्यदलात काम केल्यानंतर जसवंत सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांच्या नावात त्यांचा समावेश होतो. जसवंत सिंह यांनी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात भाजपचं प्रतिनिधित्व केलं. वित्तमंत्री असताना त्यांनी स्टेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ची सुरुवात केली होती, ज्यामुळं अनेक राज्यांना महसूल मिळू लागला होता. त्यांनी कस्टम ड्यूटी देखील कमी केली होती. भारतीय लष्करात असलेल्या जसवंत सिंह यांनी नंतर राजकारणात पाऊल टाकले. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांमध्ये जसवंत सिंह यांचाही सहभाग होता. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलं होतं.