बीड (वृत्तसंस्था) सध्या राज्यात ईडीच्या रडारवर अनेक नेत्यांची झडती सुरु आहे. ईडी भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत असे. राज्यातील गावा गावातील अनेक नेते देखील मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारात अडकले आहे. अशा परिस्थितीत बीडच्या नांदूरघाट झेडपी गटामध्ये विकासनिधीच्या रकमेत भाजपच्या सदस्याने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केला आणि ईडीने यावर लक्ष द्यावे. अशी मागणी मनसेच्या बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस (Sumant Dhas) यांनी केली आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी विकास निधीच्या कामात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीची मागणी केली आहे. या भ्रष्टाचाराची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार असल्याचे बॅनरवर नमूद केले आहे. राज्यात ईडी मोठमोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत आहे. असेच गावागावातील लहान नेतेही मोठ्या भ्रष्टाचारात अडकले आहेत. केज तालुक्यातील नांदुरघाट जिल्हा परिषद गटामध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र, यातून झालेल्या कामांत अनियमता व भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केला आहे.
१०० कोटींच्या भ्रष्टाचाराकडे ईडीने लक्ष घ्यावे आणि चौकशी करावी
१०० कोटींच्या भ्रष्टाचाराकडे ईडीने लक्ष घ्यावे आणि चौकशी करावी, अशी मागणी करणारे बॅनर मनसेने गावागावात लावले आहेत. या भ्रष्टाचाराची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार असल्याचे बॅनरवर नमूद केले आहे. गावागावात लावण्यात आलेल्या बॅनरची दखल ईडी घेईल का नाही हे सध्या अनुत्तरित आहे. मात्र, या बॅनरबाजीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.