जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११८५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २८७, जळगाव ग्रामीण-९३, भुसावळ- १९६, अमळनेर-१०३, चोपडा-१३, पाचोरा-४९, भडगाव-४५, धरणगाव-३१, यावल-३०, एरंडोल-७९, जामनेर-४४, रावेर-६९, पारोळा-२९, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-०८, बोदवड-३७, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ११८५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०० हजार ६४१ पर्यंत पोहचली असून ८७ हजार १४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १७७६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७१६ रुग्ण सध्या उपचार घेताय.