जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शहरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.
गणरायाच्या विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचीत गुन्हा घडू नये व भयमुक्त वातावरणात लाडक्या बाप्पाचे विसर्जन व्हावे. या साठी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात प्रवेश देऊ नये. याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार त्यांनी आकाश अरुण दहेकर (रा. जाखनीनगर, कंजरवाडा), पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर (रा. तुकारामवाडी), रोहित उत्तम भालेराव (रा. कासमवाडी), रोशन उर्फ बबलू हिलाल धनगर, रा. सम्राट कॉलनी), खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी), मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर (रा. संजय गांधीनगर, कंजरवाडा), बिजासन फकीरा घुगे (रा. मेहरुण तांबापुरा), सनी उर्फ सुनील महादू सोनवणे (रा. तांबापुरा), लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ (रा. अयोध्यानगर), विजय गुलाब मराठे (रा. सुप्रिम कॉलनी), कृष्णा रघुनाथ भालेराव (रा. कुसुंबा ), अजय विजय भिल (रा. शिरसोली) यांना दि. २८ रोजी शहरात प्रवेश करण्यास मनाई आदेश काढण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो हे कॉ दीपक चौधरी, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने केली.