चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरपूर- चोपडा सीमा रेषेवरील अनेर नदीचा प्रवाहाने दोन दिवसांच्या पावसामुळे जोर धरला आहे. या नदीवर असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पात २१०.०० मीटर इतका पाणीसाठा झाला असून, तो २८ टक्के इतका आहे. सद्यःस्थितीत १४.२० दशलक्ष घनमीटर इतका हा पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असल्याने नदीपात्रातील प्रवाहाला जोर आलेला दिसून येत आहे.
या धरणाची ९२.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठविण्याची क्षमता आहे. अनेर मध्यम प्रकल्पातून अनेर पात्रात सध्यः स्थितीला १५० क्यूसेक्स इतका पाणीसाठा धरणाच्या दरवाजातून वाहून जात आहे. धरणाच्या परिसरात व नदीपात्रात आतापर्यंत २०० मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. धरणाची एकूण पाण्याची उंची २१६.४० मीटर इतकी आहे. धरणाच्या पात्रात सातपुडा डोंगरात पाऊस झाल्यास पाणी वाहत येऊन जमा होत आहे. उर्वरित पाणी नदीच्या पात्रातून वाहून जात आहे. सध्याच्या परिस्थितीला डोंगरदऱ्यात बऱ्यापैकी पाऊस आहे. धरण सातपुडा पहाडाच्या पहिल्या रांगेत असल्याने पहाडात भरपूर पाऊस झाल्यास
मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या पात्रात येते. याशिवाय सातपुड्याच्या पहिल्या व दुसन्या रांगेत असलेल्या तोरी नदीमधील पाणीसुद्धा अनेरमध्येच येत असल्याने पाण्याची वाढ होते. येत्या १५ ऑगस्टपर्यंत या धरणाचे दरवाजे उघडेच असतात, तोपर्यंत धरणाच्या पात्रात आलेला अतिरिक्त पाणीसाठा नदीपात्राद्वारे वाहून जातो. गेल्या दोन-तीन दशकांचा विचार करता धरणाचे दरवाजे १५ ऑगस्टला बंद करण्यात येतात. त्यानंतर उर्वरित पाणीसाठा धरणाच्या पात्रात येणाऱ्या नदीच्या प्रवाहातून काही दिवसांत मरून धरण शंभर टक्के भरते.
या धरणाचे गाळ उपसा केला तर अजून पाणी साठवूनक होऊ शकते असे अनेक जाणकारांचे मत आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही तरी पाण्याची टंचाई बघता गाळ काढण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे. अनेर नदीच्या पात्राची फार मोठी आहे तर या नदी पत्रात ठीक ठिकाणी छोटं छोटे बंधारे बांधले गेले पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा पिकांना मुबलक पाणी मिळू शकते. आणि अनेर नदीच्या दोन्ही बाजूस हिरवळ राहू शकते.