मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव रुग्णालयाच्या औषध व साहित्य खरेदीत 45 कोटींचा गैरव्यवहार (Curroption) झाला आहे. मात्र त्याची चौकशीच होत नाही, अशी टिका करत एकनाथराव खडसे (Eknath Khadse) हे विधानपरिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते.
राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या रुग्णालयांना लागणारी औषधे व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयकावर आज विधान परिषदेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी जळगावच्या वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. यावेळी श्री. खडसे यांनी औषधे खरेदीच्या या प्रधिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
खडसे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ कसा मिळेल. या विधेयकाची गरजच नाही, कारण याने भ्रष्टाचार वाढीस लागेल. पारदर्शकता संपुष्टात येईल. आधीच जळगाव जिल्हा रुग्णालयासाठी औषधे व सर्जीकल साहित्याची खरेदी झाली, त्यात 45 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. त्या सर्व वस्तू विनावापर पडून आहेत. त्याची चौकशीही होत नाही. दरम्यान, या आरोपानंतर गिरीष महाजन (Girish Mahajan) संतापले तर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) देखील महाजनांच्या मदतीला धाऊन आले.