नाशिक (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत ८ लाख ६६ हजार २८७ रुग्णांपैकी ८ लाख २४ हजार ६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २९ हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात ११ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ आहे, तर मृत्युदर १.३५ टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३६ लाख ६१ हजार ३४९ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ८ लाख ६६ हजार २८७ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८४ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ६९ हजार ६५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२० टक्के आहे .
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ५९ हजार ७८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ लाख ४५ हजार ०४२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११ हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के इतका आहे. आजपर्यंत ३ हजार ११२ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.१९ टक्के.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ०९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४० हजार ५६२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८६४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६४ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.
जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७६ टक्के
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३० हजार ९५१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७६ टक्के इतका आहे. आजपर्यंत २ हजार ५२४ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८० टक्के आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ३९ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ हजार ४८८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६१३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के इतके आहे. आजपर्यंत ८२० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.०५ टक्के आहे.