जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
दि.२३ डिसेंबर ते दि.२९ डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन स्विकारले जाणार असून दि.३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान नामनिर्देशन स्विकारण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये दि. २५ डिसेंबर व दि.२८ डिसेंबर रोजी शासकीय सुटी असल्यामुळे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच दाखल झालेल्या अर्जाची दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी छाननी पुर्ण झाल्यानंतर लगेचच वैध ठरलेल्या नामनिर्देशन अर्जदारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर, दि.२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहिल, दि.३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम पार पडेल. त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल, यानंतर दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून दि. १६ जानेवारी सकाळी १० वाजेपासून मतदानाची मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दि.१९ जानेवारी रोजी शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे.














