धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव के.जी. गुजराथी मुकबधिर निवासी विद्यालयात काल दिनांक 26/01/2026 वार सोमवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सर्वप्रथम सुरेखा शरदचंद्र ठाकरे (जळगाव) यांचे शुभहस्ते राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदचंद्र काशिनाथ ठाकरे उपस्थित होते. सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत घेण्यात आले. त्यानंतर तंबाखूमुक्त शाळा व परिसर याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणाचे मानकरी सुरेखा शरदचंद्र ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष आर डी पाटील व संचालक एकनाथ श्रीधर पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले व प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा व्यक्त केल्या. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणं हे खरं ईश्वरीय कार्य आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच उत्तम कार्याबद्दल शाळेचे अधिक्षक योगेश पी पाटील व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आरिफ शाह यांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, आर एच पाटील व रोहन पवार यांचा उत्तम कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. जळगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ज्या विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळविले तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माता – पालक सर्व महिला – भगिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष भडांगे सरांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आर डी पाटील, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंखे, सचिव माया रविंद्र पाटील, संचालक प्रदीप ताराचंद सोनवणे, अरुण नवल पाटील, पिंजारी ताई, सोनवणे सर, जिग्नेश पटेल, शफी शाह, देशमुख दादा, शेख आरिफ व गावातील प्रतिष्ठित मंडळी मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.















