बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज दि.१ रोजी सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सकल मराठा समाज बोदवड तालुक्याच्या वतीने शासनास निवेदन दिले. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गात समाविष्ठ करुन ५० टक्के च्या आत टिकणारे आरक्षण देण्यात यावे. आज सायंकाळी पाच वाजता प्रभारी तहसीलदार मयूर कळसे यांनी हे निवेदन आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले.
उपोषणस्थळी येऊन वंचीत बहुजन आघाडीचे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व आरपीआय चे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन समर्थनार्थ पत्र दिले. तसेच विविध सामाजिक संघटनांचे व राजकीय पक्षाचे प्रतिनिधींनी उपोषस्थळी येऊन पाठींबा दिला. या उपोषणात तालुक्यातील मराठा समाजातील लोकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.