TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेंदूर्णी रासेयो एकका, नेहरू युवा केंद्रातर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि अ. र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्यावतीने “मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशन : कोरोना आणि त्यानंतर ची परिस्थिती” या महत्वाच्या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनारमध्ये देशभरातील तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला.

वेबिनारची प्रस्तावना नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर करताना वेबिनारच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. वेबिनारचे प्रमुख उदघाटक संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांनी मनोगतात आजकाल कोरोना काळात मानसिक समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे असे मत मांडुन आयोजकांचे कौतुक केले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

वेबिनरच्या या प्रथम सत्राचे अध्यक्ष कबचौ, उमवि जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे हे होते. या वेबिनारमध्ये जळगाव मधील मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यात बुधवारी मानसोपचार तज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांनी आपल्या व्याख्यानातून कोरोना काळात मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा उहापोह केला. त्यांनी आपल्या व्याख्यानातुन सकारात्मक विचार करण्यावर भर देऊन आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळविण्याच्या पध्दतीची माहिती दिली तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या कोरोना विषयी अनेक आधारहीन गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचे सूचित केले. त्यांनी आपल्या सत्रात उपस्थितांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. याविषयी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. सत्राच्या शेवटी प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात वेबिनारचे महत्व विशद केले व कोरोना काळातील गंभीर परिस्थितीत रासेयोची भूमिका विशद केली. या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी. पाटील यांनी केले व रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी आभार मानले.

गुरुवारी पार पडलेल्या द्वितीय सत्रात डॉ. विणा चव्हाण, समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे प्रास्तविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनी प्रस्ताविकात आजच्या परिस्थितीत वेबिनरच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्टे मांडली. या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील हे होते. द्वितीय सत्रात डॉ. विणा चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनातून कोरोना काळातील मानसिक स्थिती, मनातील अवाजवी भीती व समुपदेशन या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी मन ‘फाईट’ व ‘फ्लाईट’ या भूमिकेतून कश्या पद्धतीतुन जाते या विषयी विवेचन केले. तसेच त्यांनी कोरोना काळात मनाच्या नकारात्मक गोष्टींना कमी करता येण्यासाठी योग्य स्वरूपात मार्गदर्शन केले.

सत्राच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले. यामुळे स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. यानंतर स्पर्धकांमधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे व पंकज महाविद्यालय चोपडा येथील प्रा.डॉ.संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दोघांनी आपल्या मनोगतातून वेबिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

सत्राच्या शेवटी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी या कोरोना आपत्ती काळाला संपत्ती समजून सामोरे जाणाराच खरा युवा असतो असे प्रतिपादन केले. त्यांनी उपस्थित रासेयो व एनवायके स्वयंसेवकांना ह्या कोरोना आपत्ती काळात मदतीचे आवाहन केले. या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले व रासेयो महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी आभार मानले.

या वेबिनार प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.श्याम साळुंखे, प्रा.डॉ.संजय भोळे तसेच प्रा.सपकाळे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे, प्रा.योगीता चौधरी, प्रा.वर्षा लोखंडे तसेच इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक रविंद्र बोरसे, किरण उर्फ माऊली सुरवाडे, विशाल जिरे, राहुल पाटील, व्यंकटेश उपाध्ये, सचिन कुंभार, सागर तडवी यांनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधनातून दर्जेदार पीकांचा ‘महाराष्ट्र ब्रॅण्ड’ निर्माण करावा : मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू लोकांना काँग्रेस भवनात अन्नदान आणि मास्क वाटप !

May 21, 2021

वंजारी बु येथे शिवजयंती निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम संपन्न

February 20, 2022

चोपडा जैन संघाची नवी कार्यकारिणी: सुभाषचंद्र बरडिया यांची संघपतीपदी पुनर्नियुक्ती

December 27, 2024

हृदयद्रावक : पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

November 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group