चोपडा ( प्रतिनिधी) येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘दर्पण पुरस्कार’ यावर्षी मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते वितरित होणार असून,समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लताताई सोनवणे, माजी आ.कैलास पाटील,जगदीश वळवी,प्रा. चंद्रकांत सोनवणे,माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या वतीने गत १२ वर्षा पासून पुरस्कार वितरण सोहळा हा समारंभ घेण्यात येत असतो,यासाठी आजवर अनेक मान्यवर चोपड्यात आलेले आहेत यात स्व.अरुण साधू ,जेष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक भाऊ तोरसेकर,राज्यसभा सदस्य भरतकुमार राऊत,माजी मंत्री सुरेशदादा जैन,पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,जगविख्यात कवी डॉ. कुमार विश्वास,दै.जागरण चे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश तिवारी,मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनम अभिनेते मकरंद अनासपुरे,सचिन खेडेकर,हिंदी सिनेसृष्टीचे जेष्ट अभिनेते गुलशन ग्रोव्हर,हास्य अभिनेते समीर चौगुले,तर यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित येणार आहेत.
दर्पण पुरस्कारासाठी सौ.प्रीती पंकज पाटील, शे.इंम्रान शे.हारून बागवान,सागर काशिनाथ ओतारी,दिपक पुंडलिक देवराज( पोलीस अधीक्षक,मुंबई )डॉ.निलेश धनवंत सरवैय्या ( मुंबई ) सौ.अर्चना राजेंद्र पाटील,स्तेफन विजय सपकाळे,भटू लुका पाटील,गौतम अनुपचंद जैन,तळोदा,सौ.भावना पंढरीनाथ माळी,सरपंच अडावद,सुनील तिलोकचंद जैन,उद्योजक श्रीराम दयाराम पाटील, नशिराबाद,सौ.अर्पणा किरण पाटील शेळावे ता.पारोळा,उद्योजक दिपक काशिनाथ पाटील,पुणे,प्रकाश रामकृष्ण सैंदाने,वेळोदे, अनील शिवाजी बाविस्कर,निमगव्हाण,सौ.रेखा सर्जेराव पाटील,सौ.कल्पना संजय जाधव, योगेश नारायण वाघ,श्रीमती कमलबाई पंढरीनाथ व्यास,सौ.शीला सुनील देशमुख, अजय शिवाजी पाटील,एरंडोल,सौ.वंदना ज्ञानेश्वर भादले,सरपंच,सत्रासेन यांना यावर्षीचा दर्पण पुरस्कार जाहीर झाला असून दि.१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता येथील आनंदराज लॉन्स येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.तरी उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शामकांत जाधव,उपाध्यक्ष डॉ.निर्मल जैन,सचिव लतीश जैन व सदस्यांनी केले आहे.