मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात तीन वर्षाचा पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून अभ्यासक्रम एक वर्ष पूर्ण केल्यास डिप्लोमा इन जर्नालिझम आणि तीन वर्षे पूर्ण केल्यास डिग्री इन जर्नालिझम असे प्रमाणपत्र देण्यात येईल.
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेच्या आणि वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१. मागील वर्षी चे गुणपत्रक ओरिजनल
२. शेवटच्या अभ्यासक्रमाचे लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजनल
३. आधार कार्ड झेरॉक्स
इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
प्रा डॉ संदीप माळी (9421521885)