चोपडा (प्रतिनिधी) तालुक्याचे भूमिपुत्र,घोडगाव गावाचे सुपुत्र ज्यांनी आपल्या उद्योग व्यवसायात प्रचंड यश कमवीत चोपडा तालुक्याचे नाव मोठं केलं आहे, असे अॅड. संजयभाऊ जैन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. संजयभाऊ यांची नुकतीच पुणे येथील विमानतळाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री ( कॅबिनेट मंत्री ) ना.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही नियुक्ती केली आहे.
अॅड. संजयभाऊ जैन यांच्या कामाची, कार्याची दखल घेत काही महिन्यांपूर्वीच त्यांची भारत सरकारच्या वतीने केंद्रीय रल्वे बोर्डाच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यांच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली होती. त्यात आज पुन्हा दिवाळी आधीच ही गोड बातमी आल्याने चोपडा तालुका वासियांची छाती गर्वाने,अभिमानाने फुलली आहे. सद्य स्थितीत पुणे येथील पुरंदरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य विमानतळाचे कार्य सुरू असून अशातच संजयभाऊ यांची झालेली ही निवड संजयभाऊंच्या कार्याची पावती आहे. तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.