जळगाव (प्रतिनिधी) शिकाऊ उमेदवारांची १११ वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे ऑनलाइन अर्ज १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत भरावयाचे आहेत. तत्पूर्वी उमेदवारांनी त्यांच्या आधार कार्डची पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षा १३ ते १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने होईल, असे अंशकालिन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.