जामनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी नुकतेच आले होते. यावेळी युथ एज्युकेशन वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नितीन सुराणा यांनी शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यात यावी, यासाठी कृषी मंत्र्यांना निवेदन दिले.
शेतकऱ्याच्या बाजूने निवेदन देऊन वाचला शेतकऱ्याच्या दुःखाचा पाढा
जामनेर तालुक्यामध्ये दि. ७ रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले तालुक्यातील ओझर, टाकरखेडा, तळेगाव, रामपूर, लाहसर, नागन चौकी, शंकरपुरा, वाडी किल्ला येथे वादळी पावसाने व चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान केले आहे. घरांची पञे उडाली अनेक जनावरे दगावली. कपाशी, मका,केळी सर्व पिके भुईसपाट शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे कृषी मंत्र्याना सांगून शासनाकडून त्वरित मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीकडून जो विमा काढलेला आहे. त्याचा नुकसानीचा वादा करण्याची तारिख वाढवून दयावी, कारण शेतकऱ्यांना ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरताना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घराचे ही नुकसान झाले आहे. त्यासाठी ही नुकसान भरपाई भेटावी व त्याचा ही पंचनामा व्हावा अशी मागणी ह्या वेळेस नितीन सुराणा यांनी केली व ह्या बाबीचे निवेदन कृषी मंत्र्याना स्वतः व उपस्थित नुकसान ग्रस्त शेतकरी रमेश माळी व ओझर गावच्या सदस्यांकडून सुपूर्द केले.