रायगड (वृत्तसंस्था) काल सकाळीच रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना भाजप नेत्यांवर खोचक टीका केलीय. भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले कारण अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.
इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल सकाळीच रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होत. रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आली. अर्णब यांच्या अटकेनंतर देशभरातील भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अशातच आता भाजप नेत्यांच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना भाजप नेत्यांवर खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले,’भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले कारण अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजप पक्षाचा हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा. दरम्यान, गोस्वामींना ताब्यात घेतल्यानंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीमध्ये नावं असलेल्या फिरोज शेख व नितेश सारडा यांनाही अटक केली होती. या तिघांनाही पोलिसांनी रायगड न्यायालयात हजर केलं.