रायगड (वृत्तसंस्था) २०१८ साली आत्महत्या केलेले मयत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी न्यायालयात केलेल्या अर्जानुसार न्यायालयाने सदर प्रकरणी रायगड पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याने सदर प्रकरणी आत्महत्या केल्यामुळे रिपब्लिकन टीव्हीचे अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितीन सारडा यांच्याविरुद्ध आदेश झाल्याने त्यानुसार आज चार नोव्हेंबर रोजी अर्णव यास अटक करून न्यायालयात समक्ष हजर करण्यात आले आहे.
अर्णव गोस्वामी याला अटक म्हणजे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे म्हणणे साफ चुकीचे आहे. अर्णव गोस्वामी यांना रिपब्लिक टीव्हीचे संपादक म्हणून अटक केली नव्हे तर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नाही हे वैद्यकीय अहवालावरून सुद्धा सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे जळगाव मुस्लिम मंच संपूर्ण भारतातील एकमेव राजकीय पक्ष यांना विनंती करीत आहे की महाराष्ट्रातील अक्षता नाईक या आमच्या बहिणीला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना कृपया सहकार्य करा पोलीस चौकशी जर ते निर्दोष आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे कृपया करून ज्या प्रमाणे सुशांत सिंग राजपूत साठी सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन सी बी आय ची चौकशी ची मागणी करू शकतो तर आज आमच्या स्थानिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रायगड पोलीस चौकशी करीत आहे तर त्यांना चौकशीला बाधा का आणीत आहे असा सवाल सुद्धा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पोलीस व खास करून रायगड पोलीस यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अर्णव गोस्वामी यांना अटक करून चौकशी करीत असल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे, महाराष्ट्र शासनाचे व रायगड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
जळगाव मुस्लिम मंच चे दिव्यांग क्रियाशील कार्यकर्ते मुजाहिद खान यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाचे चिटणीस रमेश मोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, शहा बिरादरीचे अनिस शाह, सिकलिगर बिरादरीचे अन्वर खान, जळगाव मननियार बिरादरीचे हरीश सय्यद यांची उपस्थिती होती तर निवेदनावर एडवोकेट आमीर शेख ,अक्सा बॉईज, एडवोकेट अय्युब खान रोशनी फाउंडेशन ,रईस शेख शिवसेना उप महानगराध्यक्ष, रियाझ बागवान नगरसेवक एम आय एम यांच्या सुद्धा स्वाक्षर्या आहेत