जळगाव (प्रतिनिधी) जबरी चोरी आणि विनयभंग या दोन गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. केवल अनिल टाक (रा. वाल्मिक नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अटकेतील केवल अनिल टाक याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याला तो रहात असलेल्या भुसावळ येथील वाल्मिक नगर येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार रविद्र नरवाडे, हे.कॉ. कमलाकर बागुल, अनिल देशमुख, पो.ना रणजित अशोक जाधव, पो.ना. श्रीकृष्ण खंडेराव देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.