जळगांव प्रतिनिधी – प्रथम ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकार दरवर्षी १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करते.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा, चर्चासत्र, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य शासन क्रीडा विकास आणि खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याने या दिवसाच्या निमित्ताने खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वीफा व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना कटिबद्ध आहोत.
या निमित्ताने फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी फुटबॉलच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना खाशाबा जाधव यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करण्याचे आव्हान केले असता खेळाडूंनी त्यास उस्फूर्तपणे अनुवादन दिले व आम्ही निश्चितच खाशाबा जाधव यांच्या प्रमाणे क्रीडा क्षेत्रात कार्य करण्याचा संकल्प करणार असल्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी फुटबॉल संघटना व स्पोर्ट्स हाऊस तर्फे सर्व खेळाडूंना स्टॉकिंग,क्रीडा साहित्य व मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे सचिव फारुक शेख, हेड कोच राहील अहमद, प्रकल्प संचालक वसीम रियाज, प्रशकिय प्रमुख हीमाली बोरोले, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे व ॲड. आमिर शेख यांची उपस्थिती होती.