मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रविवारी आणखी एक ट्वीट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅम डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने खुलासा करत सॅनविले डिसूझाचे नाव समोर आणले होते. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेआधी सॅनविल स्टॅनले डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे.
सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी यांच्यातील संवाद
नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले. तसेच तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय असे म्हटले.