चोपडा (प्रतिनिधी) शरदचंद्रिका आक्का पाटील पो. बे. शासकीय आदिवासी आश्रम शाळा कर्जाने येथील आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
याबाबत होत असलेले आरोप असे की, आम्हाला जेवणामध्ये सतत एकच मेनू दिला जातो. अळ्या पडलेले जेवण विद्यार्थ्यांनां देत असतात. जेवणाचा दर्जा निकृष्ठ असतो जेवणाच्या वेळेला मुलांना जेवण वाढण्यासाठी सागितले जाते. तेथील एकही कर्मचारी जेवण वाढत नाही व जेवणाचा मेनू फलक दर्शनी जागेवर लावलेले नाही. विशेष म्हणजे मुदत संपलेले आहार अन्न मुलांना शिजवून देतात. वसतिगृहातील शौचालयची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था नाही मुख्याध्यापक शाळेत रोजचं वेळेवर उपस्थित राहत नाही. एक ते दोन कर्मचाऱ्याचा भरश्यावर सोडून चालले जात असतात.
एवढेच नव्हे तर मुला-मुलीचे वसतिगृह येथील शौचालयाची साफ सफाई मुलीकडून केली जात असते. विज्ञानचे शिक्षक शाळेत नाहीत. मुलींचे वसतिगृह सतत गैरहजर असतात. मुलींना सतत त्रास देतात. याबद्दल मुख्याध्यापक श्री.सावकारे सर यांना विध्यार्थी यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा त्याकडे ते दुर्लक्ष करीत असतात, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर शाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील आले असता वरील समस्याचे लेखी स्वरुपात विषय मांडण्यात आल्या. सदर विषयाच्या समस्या सोडविण्यात याव्यात व येथील मुख्याध्यापक गृहपाल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. जर वरील समस्या सोडविल्या नाही. तर चोपडा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदकडून दि. 7 ऑगस्ट रोजी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष नामा पावरा, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख करण शेवाळे, चोपडा तालुकाध्यक्ष सचिन पावरा आदी उपस्थीत होते.
दोषी आढळल्यास कारवाई होणारचं : प्रकल्प अधिकारी अरुण पवार !
कर्जाने आश्रम शाळेतील प्रकारा बाबत प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना दूरध्वनी वरून विचारले असता ते म्हणाले की, संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सर्व समस्याचा निराकरण व्हायला हवा अशी ताकीद दिली आहे. चांगला सकस आहार दयायला हवा ,शौचालय , वसतिगृह, परिसर स्वच्छ असायला हवा, अश्या सर्व विषया संदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच प्रकल्प अधिकारी कार्यलयाचे कर्मचाऱ्या कडून अहवाल सादर करायला सांगितले आहे. तसा अहवाल उदयापर्यंत सादर करण्यास सांगितले असून त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सांगितले.
चौकशीसाठी प्रकल्प अधिकारीकडे पाठविले : तहसीलदार
कर्जाने आश्रम शाळेबाबत आलेल्या तक्रारी अर्ज आपण अधिक चौकशी साठी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवले आहे. असे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दूरध्वनी वरून बोलताना सांगितले.