धरणगाव (प्रतिनिधी) : उच्च शिक्षणासाठी बरोबरच नैतिक मूल्यांची जोपासना करणे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे एक सक्षम व आदर्श नागरिक तयार होऊन आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होईल असे आवाहन धरणगांवचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी एका गुणवंत विद्यार्थीनीच्या सत्कार करताना म्हणाले.
धरणगाव येथील पीआर हायस्कूलचे कलाशिक्षक पी डी महाजन यांची मुलगी स्नेहल प्रशांत महाजन हिने मेडिकल प्रवेशासाठी च्या नीट परीक्षेत 575 गुण मिळवून एमबीबीएस चा प्रवेश निश्चित करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह,पेन व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी स्नेहल ने भविष्यात उत्तुंग यश संपादन करुन कुटूंबाची,समाजाची सेवा चांगल्या प्रकारे होवो ही सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ पत्रकार बी आर महाजन, स्नेहल चे पालक पी डी माळी, डॉ जागृती महाले, सिव्हिल इंजिनिअर दिपक महाजन, खुशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्नेहल माळी ने सत्कार केला म्हणून कृतज्ञता व्यक्त करीत माझ्या यशात माझ्या आई वडीलांसह माझ्या गुरुजनांचे महत्त्वाचे योगदान आहे.