धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील गंगापुरी या गावातून अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात विकास कामांच्या सपाटा लावला असून कोणत्याही जाती धर्माबद्दल भेदभाव न करत सर्वच गावांमध्ये कामांची विकास गंगा पोहोचवणे सुरू केले आहे. यामुळे मतदार संघात समाधानाचे वातावरण आहे. पालकमंत्र्यांच्या याच नेतृत्वाचा फायदा सर्वांना होतो आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी गंगापुरी गावातील कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी राहुल सोनवणे, गौतम पवार, शेखर साळुंखे, खंडू ब्राह्मणे, लोटन ब्राह्मणे, नागेश ब्राह्मणे, संजय सैंदाणे यांच्यासह अनेकांनी जाहीर प्रवेश केला. सदर कार्यकर्ते आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होते. पालकमंत्र्यांनी सर्वांचे स्वागत केले.