मुंबई (वृत्तसंस्था) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांचं किर्तन भजन सुरू आहे. आज रात्रभर राणा दांपत्यच्या घराबाहेर शिवसैनिक पहारा देत बसून राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याने उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर शिवसैनिक संतापले असून विविध मार्गातून ते राणा दाम्पत्याचा विरोध करीत आहेत. आमदार रवी राणा यांनी आज रेल्वेने मुंबईकडे जाणार अशी भूमिका घेतली होती, दरम्यान आमदार रवी राणा 21 एप्रिलच्या रात्रीच मुंबईत पोहोचले. त्यामुळे शिवसैनिक चिडलेत.
याबाबत शिवसैनिक म्हणाले की, आमदार रवी राणा भगोडा आहे. नौटंकी करतात तरी देखील आम्ही अमरावती रेल्वे स्टेशन व त्यांच्या कार्यकर्त्यांना शोधतोय, अशी शिवसेनेचे पराग गूढधे यांनी दिली. तर इतर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती रेल्वे स्टेशनवर येत राणा विरोधात घोषणाबाजी दिल्या.