जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात एकाच वेळी राज्यातील विविध शहरात पाठवलेल्या १५ पथकांनी तब्बल १२ आरोपींना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपींच्या घरी पथकांनी झाडाझडती सुरु केली असून त्यात नेमके काय आढळून येते?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ संशयिताना ताब्यात घेतले आहे. त्यात भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) या संशयितांचा समावेश आहे. अटक केलेल्या बहुतांश आरोपींच्या घराची पथकाने झाडा झडती घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडून महत्वपूर्ण कागदपत्रासह ऐवज जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या कागद पत्रांमधूनच अनेक आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.
















