जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या घरातून शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे तब्बल बनावट शिक्के आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहे.
पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी तब्बल २० कारणे दिली होती. त्यात प्रामुख्याने संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या घर झडतीमध्ये वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे अनेक बनावट शिक्के मिळून आले आहेत. (शंभराच्यावर) सदरचे संघटित गुन्हेगारकडे या शिक्क्यांबाबत विचारपूस करायची करायचं आहे, असे कारण पोलीस कोठडीच्या कारणात पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, झंवर यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात बनावट शिक्के मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे शिक्के नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांचे आहेत. याबाबत माहिती समजू शकली नाही.