जळगाव (प्रतिनिधी) सातत्याने होणारा पाठपुरावा लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी होत आहे, असे भासवण्यासाठी ‘बीएचआर’ घोटाळ्याचा चौकशी ‘ईओडब्ल्यू’ ऐवजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. परंतू हा तपास कधीही ‘एलसीबी’कडे नव्हता ‘ईओडब्ल्यू’नेच (आर्थिक गुन्हे शाखा) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. एवढेच नव्हे तर, तत्कालीन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी केंद्राला अहवाल देखील पाठवला होता, अशी माहिती समोर आली आहे.
‘बीएचआर’ घोटाळ्याचा चौकशी ‘ईओडब्ल्यू’ ऐवजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करणे संयुक्तिक नव्हते. त्याबाबतही तक्रारी झाल्या. तेव्हा दिल्लीतून चौकशी बदलाच्या सूचना करण्यात आल्या. पण राज्य सरकारकडून कृती झाली नाही, असा आरोपही खडसेंनी केला होता. दरम्यान, यासंदर्भात तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा तपास कधीही ‘एलसीबी’कडे नव्हता ‘ईओडब्ल्यू’नेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. ‘ईओडब्ल्यू’ला बदली होऊन येणारे डीवायएसपी हजर न झाल्यामुळे माझ्याकडे ‘ईओडब्ल्यू’चा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात माझी बदली झाली. तसेच तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी चौकशी देखील केली होती. एवढेच नव्हे तर, ‘बीएचआर’ ही संस्था मल्टीस्टेट असल्यामुळे तपास अन्य यंत्रणेला द्यावा, असा अहवाल तत्कालीन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी केंद्राला पाठवला होता, असे कुऱ्हाडे यांनी सांगितले.