भुसावळ प्रतिनिधी । उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या अमानवीय घटनेच्या भुसावळ वंचित बहुजन आघाडीतर्फे घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला.
त्यांनी म्हटल्यानुसार, उत्तरदेशमधील हाथरस गावातील २० वर्षी युक्तीवर दि. १४ सप्टेंबर रोजी लवकुश ठाकुर, रविसिंग ठाकुर, रामकुमार ठाकुर आणि संदिप ठाकुर या चार नराधमांनी अमानवीय पणे सामुहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या चार ही हैवानांनी पिडीतेची जीभ कापून, तिच्या मानेचा कणा मोडून, हात-पाय तोडले. यादरम्यान पिडीत युवती दिल्ली येथील (संफदरजंगा) हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देत होती. परंतू दि.२९ रोजी पिडितेने अखेरचा श्वास घेतला.
सदर घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. देशभर संतापाची लाट जनमानसात उसळलेली आहे. पिडीतेला योग्य न्याय मिळावा व दोषींना तात्काळ फाशी व्हावी यामागणीसाठी तसेच स्वर घटनेत उत्तरप्रदेश सरकारने आरोपींच्या बचावासाठी सर्वनोपरी प्रयत्न केले. याकरीता सदर अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. ०१/१०/२० २० रोजी सकाळी १०.०० वा. स्थळ महात्मा गांधी पुतळा, यावल नाका, भुसावळ येथे सनदशीर मार्गाने निदर्शने करण्यात आली आहे.