भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहकर्ज घेताना मिळकती नसतानाही इमला खरेदीसाठी सौदा पावती खोट्या करून १७ जणांनी सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक रुपयात फसवणूक केली आहे. ‘द क्लिअर न्यूज’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते.
यासंदर्भात अधिक असे की, स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेचे शाखा व्यवस्थापक मनोज प्रेमदास बेलेकर यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दि. ७ रोजी सायंकाळी फिर्याद दिली. या १७ आरोपींमध्ये कर्ज घेणारे नऊ जण, सौदा पावती करून देणारे सहा आणि मालमत्तेचे व्हॅल्यूऐशन करणारे दोन जण यांचा समावेश असून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. २०१८ ते २०२० या काळात नऊ कर्जदारांनी गृहकर्ज घेताना बँकेत नमूद मिळकतींची जादा मुल्य दाखवत खरेदी केल्याचे भासविले. त्याची जळगाव शाखेचे मुख्य प्रबंधक सुरेश सोनवणे यांच्यामार्फत चौकशी झाली.
आरोपी : कर्जदार अफसानाबानो कलीम खान, आसिफ हुसेन गवळी, माजिद खान इद्रिस खान (रा. द्वारकानगर, भुसावळ), नीलेश जय सपकाळे (रा. बुधवाडा, कन्हाळा, ता. भुसावळ), पंकज भिकनराव देशमुख (रा. पंचशील नगर, भुसावळ), राजेश निवृत्ती मेहरे (रा. गोरक्षण संस्था, भुसावळा, शोभा पोपट पगारे (रा. राहूल नगर, भुसावळ), संदीप पुजाराम मैराळे (रा. खडके, ता. भुसावळ), संतोष बबन सूर्यवंशी (रा. रामदास वाडी, भुसावळ).
सौदा पावती लिहून देणारे : गजानन रमेश शिंपी (रा. नेब कॉलनी भुसावळ), शाह शकीर चांद (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ), शशिकांत रमाकांत अहिरे (रा. फुलगाव, ता. भुसावळ), शकील इमाम गवळी (रा. कन्हाळे बुद्रुक, ता. भुसावळ), शाह अरबाज शाह अब्बास (रा. पंचशील नगर, भुसावळ), अक्सानाबानो कलीम खान (द्वारकानगर, भुसावळ)
व्हॅल्युअर : समीर बेले (रा. रॉयल हब बिल्डींग, मालेगाव), अशोक दहाड (रा. नवीपेठ. जळगाव).