मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाबाधित (Corona Virus) रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अशात गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ (Work Form Home) करता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी मुंबईत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना २४ तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतही गेल्या २४ तासांमध्ये ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ”कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी ५५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आला आहे. त्यांनी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे.”















